IND vs SL, 2nd Test, Day 2, Live Score: भारताला चौथा धक्का; विराट कोहली 13 धावांवर पायचीत
भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं. भारताने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात 252 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 92 धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाला पहिल्या डावात 109 धावात रोखल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल क्रिझवर दाखल झाले आहेत. तर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने चेंडू सुरंगा लकमलच्या हाती सोपवला आहे.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने टिच्चून मारा केला. त्यांनी आपल्या गोलंदाजीने श्रीलंकन फलंदाजांना चांगलंच सतावलं. श्रीलंकेने पहिल्या दिवसाच्या अखेरीस सहा विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज भारतीय गोलंदाजांनी केवळ 6 षटकात पाहुण्यांच्या उरलेल्या 4 फलंदाजांना बाद केलं. श्रीलंकेचा संघ 109 धावांवर गारद झाला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवी अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.