टीम इंडियाचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय, मालिकेत १-० ने आघाडी
भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या रंगतदार सामन्यात भारताने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा ब्रिगेडने श्रीलंकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करत वानखेडे मैदानावर २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पहिल्यांदा बचाव करताना एक नवीन इतिहास रचला. भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली.
श्रीलंकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करत वानखेडे मैदानावर २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पहिल्यांदा बचाव करताना एक नवीन इतिहास रचला. दिपक हुड्डाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.भारतीय संघ पहिल्या टी२० सामन्यात नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
श्रीलंका संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार दसून शनाका याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूत ४५ धावा केल्या. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांच्या शानदार भागीदारीमुळे टीम इंडियाने पाच गडी गमावून १६२ धावा केल्या. दीपक हुडाने सर्वाधिक ४१ धावा केल्या. इशान किशनने ३७, अक्षरने ३१आणि हार्दिकने २९ धावा केल्या.शिवम मावीने धारदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना पळताभुई थोडी केली. हार्दिक पांड्याने संघाच्या कर्णधाराची जबाबदारी उत्तम पार पाडली.