भारत-पाक महामुकाबल्याला सुरुवात; नाणेफेकीचा निकाल भारताच्या पारड्यात

भारत-पाक महामुकाबल्याला सुरुवात; नाणेफेकीचा निकाल भारताच्या पारड्यात

भारत पाक हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. आशिया चषक 2023च्या निमित्ताने हे दोन्ही संघ एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज आहेत.
Published on

नवी दिल्ली : भारत पाक हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. आशिया चषक 2023च्या निमित्ताने हे दोन्ही संघ एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी सामन्यातील नाणेफेक भारताच्या पारड्यात पडली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन टीम जाहीर झाली आहे. यानुसार मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर, अनुभवी मोहम्मद शमीला संधी मिळालेली नाही. भारतीय संघ कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरले आहेत. दरम्यान, बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने नेपाळला हरवून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिलाच सामना आहे.

पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन:

फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

भारताने प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com