IND vs NZ 1st Test, Day 5 : न्यूझीलंडला 150 धावांची गरज, तर भारत विजयापासून 5 विकेट दूर
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सूरू असलेला भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. या सामन्यात न्यूझीलंड विजयापासून 150 धावा दूर आहे, तर भारताला 6 विकेटसची गरज आहे.
भारताची चौथ्या दिवशी डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. सकळाच्या सत्रात सुरुवातीला भारताने चेतेश्वर पुजाराची (22) विकेट गमावली. त्यानंतर पाठोपाठ अजिंक्य रहाणेदेखील माघारी परतला. रहाणेनंतर मैदानात आलेला रवींद्र जाडेजादेखील शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 5 बाद 51 अशी झाली होती. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने रवीचंद्रन अश्विनच्या (32) साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनी 6 व्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या ऋद्धीमान साहाला सोबत घेऊन श्रेयसने धावफलक हलता ठेवला. या दोघांनी 7 व्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. श्रेयसने या डावात 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर साहा आणि अक्सर पटेलने 8 व्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी केली. या तीन भागीदाऱ्यांच्या जोरावर भारताने 7 बाद 234 धावांवर डाव घोषित केला. साहाने 126 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.
भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.