IND vs ENG: पहिल्या टी-20 विजयानंतर आज दुसरी मालिका
नवी दिल्ली : इंग्लंडविरुध्द (England) भारताने (India) शुक्रवारी पहिला टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (Birmingham) येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. त्या सामन्यात भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडसमोर 198 धावांचे आव्हान उभारले. यामध्ये भारताकडून सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी अनुक्रमे 39 आणि 51 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी २ बळी घेतले. भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 148 धावांवर सर्व विकेट गमावल्या, तर मोईन अलीने 36 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 4 बळी घेतले.
तर, भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताला फॉर्म कायम ठेवण्याची आशा असेल. तर इंग्लंडचे येथे पुनरागमन करण्याचे लक्ष्य असेल. भारत जिंकून आघाडी घेणार कि इंग्लंड मालिकेत बरोबरी करणार ? याची क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.
दुसऱ्या टी-२० मध्ये दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), जेसन रॉय, डेविड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, हॅरी ब्रूक, रीस टोपले, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किन्सन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल