IND vs ENG 1ST T20 : वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग T20 सामन्यासाठी मैदानात
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या टी-२० मालिकेत एजबॅस्टनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची भारतीय संघाला संधी आहे. या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. नुकताच कोरोनाशी यशस्वी लढा देऊन आलेला रोहित आता इंग्लंडशी लढा देण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एजबॅस्टन कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही पहिल्यांदाच T20 सामन्यात खेळणार आहे. हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणर आहे. कॅप्टन रोहित शर्माच्या हस्ते अर्शदीप सिंहला कॅप देण्यात आली. पहिल्या T20 साठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात विराट कोहली, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि ऋषभ यांच्या नावांचा समावेश नाही. हे सर्व खेळाडू दुसऱ्या टी-20 सामन्याद्वारे संघात सामील होतील. कॅप्टन जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोनसारखे खेळाडू इंग्लंड संघात आहेत.
पहिल्या T20 साठी भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवीश पटेल , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.