IND vs BAN : भारताने नाणेफेक जिंकली; 'या' युवा खेळाडूला पदार्पणाची संधी
नवी दिल्ली : आशिया कप 2023 मधील सुपर-4 टप्प्यातील शेवटचा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये टिळक वर्माला टीममध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, या स्पर्धेत आतापर्यंत आम्हाला नंतर फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे आम्ही या सामन्यात तसे करण्याचा निर्णय घेत आहोत. आम्हाला या सामन्यात काही खेळाडूंना संधी द्यायची आहे, ज्यासाठी आम्ही आमच्या प्लेइंग 11 मध्ये 5 बदल केले आहेत. या सामन्यात विराट, हार्दिक, बुमराह, सिराज आणि कुलदीप खेळत नाहीत.
भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान आधीच पक्के केले आहे. त्याचवेळी बांगलादेशचा संघ सुपर-4चे सुरुवातीचे दोन्ही सामने गमावून अंतिम फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे.
भारताची प्लेईंग 11
रोहित शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा.
बांगलादेशची प्लेईंग 11
लिटन दास, तन्झीद हसन तमीम, अनामूल हक, शकीब अल हसन, तौहीद हृदय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.