IND vs AUS, World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलपूर्वी काय म्हणाला रोहित शर्मा?
रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत विविध विषयावर भाष्य केले. आतापर्यंत सर्व चांगले झालेय, उद्याही चांगलेच होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. तसंच ऑस्ट्रेलियाने सलग आठ सामन्यात विजय मिळवला, त्याबाबत फारसं काही वाटत नाही, असे रोहित शर्मा म्हणाला आहे.
तो म्हणाला की, ऑस्ट्रेलियाचा संघ प्रभावी कामगिरी करतोय, त्याची आम्हाला काहीच अडचण नाही. त्यांनी मागील आठ सामने जिंकले. फायनलचा सामना रंगतदार होईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. विश्वचषकाची फायनल खेळणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. 50 षटकांचा विश्वचषकात पाहतच मी लहानाचा मोठा झालेय, असेही रोहित म्हणाला.
फायनलसाठी महत्वाचं काय आहे? यावर लक्ष द्यायला हवं. त्यासाठी खूप वेळ दिलाय.. अन् लक्ष केंद्रीत केलेय. आतापर्यंत जी तयारी केली, त्यावरच कायम राहायला हवे. पहिल्या सामन्यापासूनच आम्ही त्यावर लक्ष केंद्रीत केलेय. फायनलमध्येही तसेच करु... भारतीय क्रिकेटर म्हणून नक्कीच दबाव असेल. खेळाडू म्हटले की, कौतुक टीका अन् दबाव या गोष्टी येतातच, असे रोहित शर्मा म्हणाला.
प्लेईंग 11 वर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, सर्व 15 खेळाडूंकडे खेळण्याची संधी आहे. आज आणि उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर 12-13 खेळाडू निवडले जातील. पण प्लेईंग 11 अद्याप तयार नाही. सर्व 15 खेळाडू सामन्यासाठी तयार असावेत.
रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. दोन्ही संघ भन्नाट फॉर्मात आहेत, त्यामुळे फायनलचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवलाय, तर ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडचा पराभव करत फायनल गाठली तर ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा पराभव करत भारतापुढे आव्हान उभे केलेय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना भारताने 6 विकेट्सने आणि दक्षिण आफ्रिकेने 134 विकेट्सने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.