IND Vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय

IND Vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय

हातातून निसटणारा सामना टीम इंडियानं फिरवला, 5 धावांनी बांगलादेशवर रोमहर्षक विजय
Published by :
Sagar Pradhan
Published on

आज ऑस्ट्रेलियामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना पार पडला. अतिशय अश्या या अटीतटीच्या रंजक सामन्यात अखेर भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून दमदार खेळ, मग पावसाचा व्यत्यय, ओव्हर्ससह टार्गेटमध्ये बदल झाल्यानंतर अखेर भारतानं 5 धावांनी सामना जिंकला आहे. त्यामुळे अगदी रोलरकोस्टर राईडप्रमाणे झालेला सामना अखेर भारताच्या बाजूने झुकला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ येथे झालेल्या पराभवानंतर, आज बुधवारी अॅडलेड ओव्हलवर हा सामना पार पडला. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्हा संघासाठी आजचा सामना महत्वाचे होते. आता भारताने बांग्लादेशला पराभव करत उपांत्य फेरीसाठी जागा निश्चित केली आहे.

बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने टॉस जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज होती. पण या सामन्यात पावसाने अडथळा आणला. त्यामुळे सामना 20 ऐवजी 16 षटकांचा करण्यात आला. बांग्लादेशला विजयासाठी 16 षटकात 151 धावांच टार्गेट देण्यात आले. त्यावेळी त्यांना 9 ओव्हर्समध्ये 85 धावांची गरज होती. पावसाच्या आधी बांग्लादेश अतिशय उत्तम कामगिरी करताना दिसत होता.बांग्लादेशचा एकही विकेट गेला नव्हता. आधी फलंदाजी करत भारतानं 184 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. सलामीवीर लिटन दासनं एकहाती सामना बांगलादेशला जिंकवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण केएलनं केलेनं 8 व्या षटकांत केलेल्या एका थरारक थ्रोनं दासला धावचीत केलं आणि तिथून सामना फिरला. पाऊस थांबल्यावर बांगलादेशला 16 षटकात 151 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळं 16 षटकात बांगलादेश 145 धावाच करु शकला आणि ज्यामुळं भारतानं 5 धावांनी जिंकला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com