ICC T20 रँकिंग: सूर्या T20 क्रमवारीत हिरो, पाकिस्तानच्या कर्णधाराला टाकले मागे
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले,त्यानंतर मात्र चांगली गोष्ट घडली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय फलंदाजांना या यादीत स्थान मिळाले आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये तिसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. बुधवारी नव्याने रँकिंगची यादी प्रसिद्ध झाली. सूर्यकुमारच्या क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा झाली. 780 रेटिंग पॉइंटसह तो तिसऱ्या नंबरवर पोहोचला आहे.
भारताचा स्फोटक स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्यकुमारने दमदार खेळत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले आहे. बाबर आझमने एक धाव गमावल्यामुळे तो मागे पडला आहे. सूर्यकुमार यादवचे एकूण 780 रेटिंग गुण आहेत, तर बाबर आझमचे 771 रेटिंग गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 46 धावा केल्या, ज्यात 4 षटकारांचाही समावेश होता. मात्र, सूर्यकुमार यादवची ही खेळी टीम इंडियासाठी कामी आली नाही. आणि या सामन्यात भारताला चार विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले.