Champions Trophy In Pakistan
Champions TrophyGoogle

Champions Trophy: ICC कडून पाकिस्तानला मोठा दिलासा! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केली मोठी घोषणा

टी-२० विश्वचषकानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. पाकिस्तान या बड्या टूर्नामेंटचं यजमानपद भूषवणार आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

ICC Grant Budget For Champions Trophy 2025 : टी-२० विश्वचषकानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. पाकिस्तान या बड्या टूर्नामेंटचं यजमानपद भूषवणार आहे. तमाम क्रिकेटप्रेमींची चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही टूर्नामेंट पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून या टूर्नामेंटचा प्रस्तावित कार्यक्रम आयसीसीला आधीच पाठवला आहे. त्यानंतर आता आयसीसीने पासीबीला आनंदाची बातमी दिली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या बजेटला मंजुरी देण्याबाबत घोषणा केली आहे.

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या बजेटला दिली मंजूरी

कोलंबोत सोमवारी आयसीसीच्या चार दिवसीय वार्षिक सम्मेलनाचा समारोप झाला. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या बजेटला मंजूरी देण्यात आली. आयसीसीकडून याबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. पीसीबीने या टूर्नामेंटचं आयोजन करण्यासाठी तीन व्हेन्यू निवडले आहेत. यामध्ये लाहोर, कराची आणि रावलपिंडीच्या नावाचा समावेश आहे.

पीसीबीकडून या स्टेडियमच्या नुतनीकरणासाठी १२.८० मिलियनचा बजेट मंजूर करण्यात आला आहे. आयसीसीचे मुख्य वित्तीय अधिकारी अंकुर खन्ना आणि पीसीबीचे मुख्य वित्तीय अधिकारी जावेद मुर्तजाने बजेट तयार केलं होतं. या संमलेनात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व मोहसिन नकवीनं केलं. बीसीसीआयने हायब्रिड मॉडलचा प्रस्ताव ठेवला आहे. कारण पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्याची परवानगी सरकारने टीम इंडियाला दिली नाहीय. त्यामुळे बीसीसीआयने आयसीसीला विनंती केली आहे की, टीम इंडियाच्या सामन्यांचे आयोजन दुबई किंवा श्रीलंकेत केलं जावं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com