श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा 'हा' असेल कर्णधार, जाणून घ्या संभाव्य भारतीय संघ
बांगलादेशचा दौऱ्या झाल्यानंतर भारतीय संघ आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी या मालिकेत दोन्ही संघात तीन टी 20 सामने खेळवले जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरीजसाठी मंगळवारी टीम इंडियाची निवड होऊ शकते. 3 ते 17 जानेवारी दरम्यान भारत विरुद्ध श्रीलंका मालिका खेळली जाणार आहे. परंतु, श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत मोठे बदल संघात करण्यात आले आहे. या मालिकेत भारतीय संघाचे हार्दिक पंड्या नेतृत्व करताना दिसू शकतो. तर जाणून घ्या असा असेल हा श्रीलंका दौरा आणि अशी असेल संभाव्य भारतीय टीम.
श्रीलंका मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ:
शुभमन गिल, पृथ्वी शॉ, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अक्षर पटेल.
भारताचा श्रीलंका दौरा 2023:
• पहिला T20 - 3 जानेवारी (मुंबई)
• दुसरा T20 - 5 जानेवारी (पुणे)
• तिसरा T20 - 7 जानेवारी (राजकोट)
• पहिला एकदिवसीय - 10 जानेवारी (गुवाहाटी)
• दुसरी वनडे - 12 जानेवारी (कोलकाता)
• तिसरी वनडे - 15 जानेवारी (तिरुवनंतपुरम)