Harmanpreet Kaur Record
Harmanpreet Kaur Twitter

हरमनप्रीत कौरने रचला इतिहास; महिला टी-२० मध्ये ऐतिहासिक कारनामा करणारी ठरली जगातील तिसरी खेळाडू

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Harmanpreet Kaur Created History : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ५ जुलैला चेन्नईल रंगला. या सामन्यात हरमनप्रीत कौरने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरमनप्रीत कौर सर्वाधिक धावा करणारी तिसरी खेळाडू बनली आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात सामना होण्यापूर्वी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत हरमनप्रीत चौथ्या स्थानावर होती. परंतु, सामना संपल्यानंतर हरमनप्रीत वेस्टइंडिजची महिला खेळाडू स्टेफनी टेलरला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली.

स्टेफनी टेलरने आपल्या संघासाठी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १२१ सामने खेळले आहेत. तिने ११८ इनिंगमध्ये ३५.१३ च्या सरासरीनं ३३३८ धावा केल्या आहेत. तसच टेलरच्या नावावर २२ अर्धशतकांची नोंद आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या सामन्यानंतर हरमनप्रीत कौरने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३४४ धावा केल्या आहेत. तिने देशासाठी १६७ सामने खेळले असून २७.८६ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कौरच्या नावावर १ शतक आणि ११ अर्धशतकाची नोंद आहे.

न्युझीलंड महिला क्रिकेट संघाची धाकड फलंदाज सूजी बेट्सच्या नावावर महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तिने आपल्या संघासाठी१५७ सामने खेळले असून १५४ इनिंगमध्ये २९.७९ च्या सरासरीनं ४२३१ धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मेग लॅनिंग दुसऱ्या स्थानावर असून तिने १३२ सामने खेळले असून १२१ इनिंगमध्ये ३६.६१ च्या सरासरीनं ३४०५ धावा केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com