RR VS GT: रशिदची हटकेबाज फलंदाजी; गुजरातने राजस्थानचा 3 गडी राखून केला पराभव
आयपीएल 2024 चा 24 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टासटन्स यांच्यामध्ये जयपूर येथे खेळला गेला. गुजरात टायटन्सने हा सामना राजस्थान रॉयल्सवर 3 गडी राखून जिंकला. गुजरात टायटन्सने या मोसमात तिसरा विजय नोंदवला तर राजस्थान रॉयल्सला घरच्या मैदानावर पहिला पराभव स्वीकारावा लागला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. संजू सॅमसनच्या संघाने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने 3 विकेट्स राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 3 गडी गमावून 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 199 धावा केल्या. रशीद खानने शेवटच्या 2 षटकांत सामना गुजरातच्या बाजूने वळवला. या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत 6वे स्थान गाठले आहे. आता त्यांच्या संघाच्या खात्यात एकूण 6 गुण आहेत. त्याचवेळी पंजाबचे नुकसान झाले आहे. ते सातव्या स्थानावर पोहचले आहे तर राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग 11:
संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स प्लेइंग 11:
शुभमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मोहित शर्मा.