क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर; आता थिएटरमध्ये पाहा T20 वर्ल्ड कप सामने
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता थिएटरमध्ये पाहा T20 वर्ल्ड कप सामने पाहता येणार आहेत. आयनॉक्स या मल्टीप्लेक्स कंपनीने आयसीसीसोबत करार केला आहे. आयनॉक्स थिएटरमध्ये 23 ऑक्टोबरपासूनचे भारताचे टी20 विश्वचषकातील सर्व सामन्यांचं थेट प्रसारण करणार आहे. 23 ऑक्टोबरपासून याची सुरुवात होणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारताचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरोधात रंगणार आहे. यानंतर भारताचे विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांचं आयनॉक्स थिएटरमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.
'सिनेमांगृहांमध्ये क्रिकेटचे स्क्रीनिंग करून आम्ही आपल्या देशातील सर्वात आवडत्या खेळासोबत मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा अनुभव चाहत्यांना देऊ इच्छितो. मोठ्या पडद्यावर क्रिकेट पाहण्याचा अनुभव क्रिकेटप्रेमींसाठी आनंददायक असेल. मोठा पडडा आणि चाहत्यांचा उत्साह यामुळे एक वेगळा अनुभव मिळेल. किक्रेटप्रेमींसाठी ही एक व्हर्च्युअल ट्रीट असेल. असे INOX Leisure चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद विशाल यांनी सांगितलं.
आगामी आयसीसी पुरुष T20 विश्वचषक मध्ये भारतात खेळले जाणारे सर्व सामने आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये लाईव्ह पाहता येणार आहेत. यासोबतच 'INOX टी20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाद्वारे खेळले जाणारे सर्व सामने थिएटरमध्ये दाखवेल. भारतीय संघाचे सर्व लाइव्ह सामने 25 हून अधिक शहरांमधील INOX मल्टिप्लेक्समध्ये दाखवले जातील. असे आयनॉक्सनं म्हटलं आहे.