वर्ल्डकपमध्ये मॅक्सवेल नावाचं वादळ; केवळ 'इतक्या' चेंडूत ठोकलं वेगवान शतक
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने केवळ 40 चेंडूत शतक झळकावून वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलँड्सविरुध्द खेळताना मॅक्सवेलने झंझावती शतक केले आहे. एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचा विक्रम मोडला आहे.
ग्लेन मॅक्सवेलने केवळ 40 चेंडूत आपले वेगवान शतक पूर्ण केले. या खेळीत 8 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. बास डी लीडेच्या बॉलवर षटकार ठोकून मॅक्सवेलने आपले शतक पूर्ण केले. मात्र, मॅक्सवेल पुढच्याच षटकात लोगान व्हॅन बीककडे झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 44 चेंडूंत नऊ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 106 धावांची खेळी केली. दरम्यान, मॅक्सवेलने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 51 चेंडूत शतक झळकावले होते.
एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) - 40 चेंडू विरुद्ध नेदरलँड, 2023
एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका) – 49 चेंडू वि. श्रीलंका 2023
केविन ओब्रायन (आयर) - 50 चेंडू वि. इंग्लंड, 2011
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – 51 चेंडू वि. श्रीलंका 2015