क्रीडा
चौथ्या दिवसाचा खेळ संपला; WTC फायनल जिंकण्यासाठी आता भारताला 280 धावांची गरज
444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. हा सामना ओव्हल मैदानात सुरू आहे. याच सामन्यातील आज चौथ्या दिवशी 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत भारताने 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. सध्या भारताकडून विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे धुरा सांभाळत आहे. या दोघांही नाबाद 71 धावांची भागिदारी केली आहे.
आजचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 44 धावांवर तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत होते. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारत विकेट फेकली. रोहित शर्मा 43 तर चेतेश्वर पुजारा 27 धावांवर बाद झाले. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी विजयासाठी भारताला 280 धावांची गरज आहे. त्यामुळे आता उद्या कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.