चर्चांना पुर्णविराम : अखेरी सौरभ गांगुलीनेच केला राजीनाम्यावर खुलाशा, म्हणाले...
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली. सौरवने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, २०२२ हे वर्ष माझ्या क्रिकेट प्रवासाचे ३० वे वर्ष आहे. आता मला लोकांचे नवीन काहीतरी करायचे आहे. यानंतर सौरवने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. परंतु, काही वेळातच बोर्डाचे सचिव जय शाह यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की सौरव गांगुलीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यानंतर सौरभ गांगुलीने खुलाशा केला. मी राजीनामा दिला नाही तर नवीन शैक्षणिक अँप लॉन्च करत असल्याचे सौरभ गांगुलीने जाहीर करत सर्व चर्चांना पुर्णविरोम दिला.
BCCI अध्यक्षपदाचा सौरभ गांगुली यांनी राजीमाना दिला आहे. आता नवीन इनिंग सुरु करणार असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांगुलीने म्हटले आहे की, तो नवीन योजना बनवत आहे. गांगुली राजकारणात उतरणार असल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे. गांगुलीची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. गांगुली म्हणाला- मी नव्या इनिंगची तयारी करत आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी, गांगुली लवकरच आपली राजकीय खेळी सुरू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यामुळे या चर्चांनाा पूर्णविराम मिळाला. बीसीसीआयचे सचिव जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आणि गांगुलीचे जवळचे मित्र आहेत. आयपीएल फायनल दरम्यान अमित शहा आणि गांगुली खूप जवळ दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप गांगुली यांना राज्यसभेवर पाठवू शकते.