उद्या होणार भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये पहिला कसोटी सामना, कधी, कुठं असेल सामना
भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. मात्र, या दौऱ्यात भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्या पासून 14-18 डिसेंबरदरम्यान खेळला जाणार आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी, कुठं खेळला जाणार आहे? हे जाणून घ्या.
कधी, कुठं असेल सामना?
भारतीय संघ अणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार, सकाळी 9. 30 वा सामन्याला सुरूवात होईल. अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येईल सामना?
या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लिव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.
असा असेल भारताचा कसोटी संघ
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.
असा असेल बांगलादेशचा कसोटी संघ
शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.