आज होणार पहिला T20; टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा फेरबदल
ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत पराभूत केल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. आजपासून म्हणजेच बुधवार 28 सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पार्श्वभूमीवर या सामन्यात अनेक मोठे बदल करू शकतो. जाणून घ्या या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी, दीपक हुड्डा पाठदुखीमुळे टीम इंडियाचा भाग असणार नाही. बुधवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या T20 मध्ये फक्त केएल राहुल आणि रोहित शर्मा खेळाची सुरुवात करतील. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच टीम इंडियाचा गोलंदाज युजवेंद्र चहल चांगली कामगिरी करत नसल्याने आशिया कपनंतर ऑस्ट्रेलिया मालिकेत तो त्याची छाप पाडू शकला नाही, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये त्याच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 ही रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल आणि रविचंद्रन अश्विन. अशी असणार आहे.