विराटचं देशप्रेम; पाहा व्हिडिओ
गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २३७ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ३ बाद २२१ धावांवर मर्यादित राहिला. डेव्हिड मिलर (४७ चेंडूंत नाबाद १०६) आणि क्विंटन डीकॉक (४८ चेंडूंत नाबाद ६९) यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
या सामन्याच्या दरम्यान विराटचे देशाबद्दलचे प्रेम दिसून आले. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिकने षटकाच्या पाचव्या चेंडूपूर्वी विराट कोहलीला आपलं अर्धशतक पूर्ण करायचं आहे का, असं विचारलं. यावर विराटनं त्याला नाही म्हणाला. विराटचे यातून देशप्रेम दिसून आले. विराटने दाखवून दिलं की देश आधी त्यानंतर आपण. शेवटचे दोन चेंडू होते ज्यात दिनेश कार्तिकने षटकार मारलं.
भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. टी-20 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्यकुमार यादव (२२ चेंडूंत ६१ धावा) आणि केएल राहुलच्या (२८ चेंडूंत ५७) फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी मात केली.