भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
लोकशाही न्यूज नेटवर्क | भारता विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात आघाडीचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचं पुनरागमन झालं आहे.भारताविरोधाच चेन्नई येथे होणाऱ्या दोन कसोटी सामन्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
पुढील महिन्यात पाच फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळानं आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघात बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन झालं आहे. त्यांच्याशिवाय कोरोनातुन सावरलेला अष्टपैलू मौईन अली याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय श्रीलंका दौऱ्याचा भाग असलेली अनुभवी वेगवान गोलंदाजांची जोडगोळी जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड संघात कायम आहेत.
इंग्लंडचा संघ
जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, झॅक क्रॉवली, डॅन लॉरेन्स, ऑलिव्हर स्टोन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जॅक लीच