England vs Oman
England vs Oman

फक्त २ षटकार ठोकले अन् इंग्लंडच्या फलंदाजाने रचला इतिहास! टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या २८ व्या सामन्यात इंग्लंडने ओमान संघाचा धुव्वा उडवला. या सामन्यात इंग्लंडने ओमानविरोधात ८ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.
Published by :
Naresh Shende
Published on

England vs Oman, T20 World Cup : टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या २८ व्या सामन्यात इंग्लंडने ओमान संघाचा धुव्वा उडवला. या सामन्यात इंग्लंडने ओमानविरोधात ८ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडचा सलामी फलंदाज फिल सॉल्टने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने या सामन्यात दोन षटकार ठोकले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं यश संपादन केलं.

फिल सॉल्टने रचला इतिहास

ओमान विरोधात झालेल्या सामन्यात फिल सॉल्टने पहिल्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर सलग षटकार ठोकले. ओमानचा गोलंदाज बिलाल खानच्या गोलंदाजीवर सॉल्टने हे षटकार ठोकले. टी-२० वर्ल्डकपमध्ये इनिंगच्या पहिल्या दोन चेंडूवर सलग दोन षटकार ठोकणारा सॉल्ट पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कोणत्याही देशाच्या सलामी फलंदाजाने केला नाहीय.

फिल सॉल्टच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झालीय. परंतु, सॉल्टला या सामन्यात मोठी धावसंख्या करण्यात यश आलं नाही. सलग दोन षटकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सॉल्ट त्रिफळाचीत झाला. सॉल्टने ३ चेंडूत दोन षटकार मारून १२ धावा केल्या. ओमानने इंग्लंडविरोधात प्रथम फलंदाजी केली. परंतु, इंग्लंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळं ओमानचा संपूर्ण संघ अवघ्या ४७ धावांवर गारद झाला. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडने १०१ चेंडू राखून या सामन्यात विजय मिळवला. इंग्लंडसाठी आदिल रशिदने सर्वाधिक ४ आणि जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com