Latur Sports | Latur News
Latur Sports | Latur Newsteam lokshahi

लातूरची 'ज्ञानेश्वरी' करणार तलवारबाजीत देशाचंं नेतृत्व

इंग्लडमध्ये होणार स्पर्धा, लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी केली मोलाची मदत
Published by :
Shubham Tate
Published on

लातूर (वैभव बालकुंदे) - लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या, ज्ञानेश्वरी माधव शिंदे हिची तलवारबाजीत इंग्लड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ज्ञानेश्वरीने अतिशय मेहनतीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपलं स्थान पक्के केले आहे. शिरूरच्या कन्येला पुढील प्रवासासाठी लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सी एस आर मधून एक लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. (Dnyaneshwari of Latur will lead the country in fencing)

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. उपसंचालक सुधीर मोरे यांच्या सकारात्मकतेतून व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या प्रयत्नातून ज्ञानेश्वरी माधव शिंदेला निधी उपलब्ध करण्यात आला. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून निधी उभारण्याची सुरुवात करण्यात आली.

Latur Sports | Latur News
CWG 2022 Winner List Day 9 : क्रिकेटमध्ये पदक निश्चित, लॉन बॉलमध्ये रचला इतिहास

ज्ञानेश्वरीने इयत्ता पाचवी पासून तलवारबाजी खेळाच्या सरावाला सुरुवात केली. आज पर्यंत तीने राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत अनेक विजय मिळवून पदक प्राप्त केले आहेत. आता ती थेट तलवारबाजीच्या आंतरराष्ट्रीय मैदानात उतरली असून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली आहे. ज्ञानेश्वरीची कौटुंबिक परिस्थिती नाजूक आहे वडील नोकरी निमित्त बाहेर गावी असतात. आईच्या पाठीच्या मनक्यात गॅप आहे त्यामुळे ती अंथरुणाला खिळून आहे. अशात ज्ञानेश्वरीने झेप घेतलेली आहे. हे तीचे खेळा प्रती असलेलं समर्पण, परिस्थितीपुढे हार मानायची नाही ही जिद्द. या साऱ्या गुणांमुळे ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचली आहे.

तिच्या घरची परिस्थिती बिकट आहे. ही बाब लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत मोरे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यानंतर लकडे यांनी क्रीडा उपसंचालक लातूर व जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष तथा लातूर जिल्हाधिकारी यांच्या समोर ठेवली.

Latur Sports | Latur News
युद्धाच्या तयारीत चीन; तैवानही कमी नाही, लष्कराचे फोटो आले समोर

त्यातून तिला एक लाख रुपये देण्याचे मंजूर झाले. आज तलवारबाजी जिल्हा अध्यक्ष अभिजीत मोरे यांच्याकडे एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कोणत्याही खेळाडूला खेळातील कोणतीच अडचण रोखू शकत नाही. खेळाडूंनी आपले योगदान देत रहावे. अडचणी क्रीडा विभाग संपवेल असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे यांनी यावेळी व्यक्त केले.

स्पर्धा इंग्लडमध्ये होणार

ज्ञानेश्वरी शिंदे ही भारतीय खेळ प्राधिकरण प्रशिक्षण केंद्र छञपती संभाजी नगर येथे सराव करत आहे. ती या स्पर्धेत पदक विजेती होईल अशी आशा तिचे प्रशिक्षक मोरे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न करून ही मदत दिली त्याबद्दल तलवारबाजी जिल्हा संघटनेचे सचिव गलाले यांनी आभार व्यक्त केले. ज्ञानेश्वरीच्या निवडीबद्दल लातूरच्या क्रीडा क्षेञातून सर्वदूर कौतुक होत आहे. ती जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंचे ती प्रेरणास्थान बनली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com