IPL 2024: राजस्थानचा पराभव झाल्यानंतर तरुणी ढसाढसा रडली; व्हिडीओ व्हायरल झाल्यावर खास कनेक्शन आलं समोर
IPL 2024, RR vs SRH : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. त्यामुळे राजस्थानचा संघ टूर्नामेंटमधून बाहेर झाला आहे. हैदराबादने राजस्थानचा ३६ धावांनी पराभव करून आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, राजस्थानचा संघ पराभवाच्या छायेत असताना स्टेडियममध्ये असणारी एक मुलगी ढसाढसा रडली. या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता राजस्थानच्या जबरा फॅनचं सत्य समोर आलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या माजी खेळाडूसोबत या चाहत्यांचं खास कनेक्शन आहे.
व्हायरल व्हिृडीओत रडताना दिसणारी तरुणी राजस्थान रॉयल्सचे फिल्डिंग कोच दिशांत यागनिक यांची मुलगी आहे. दिशांत फिल्डिंग कोच होण्याआधी राजस्थानसाठी आयपीएलमध्ये खेळले आहेत. दिशांतने स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
सोशल मीडियावर एका फेक अकाउंटने या मुलीचे रडण्याचे फोटो व्हायरल केले होते. त्यानंतर दिशांतने हे फोटो तातडीने हटवण्यासाठी आवाहन केलं होतं. कृपया माझ्या मुलीचे फोटो प्रोफाईलमधून डिलीट करा, हा एक भावनिक क्षण होता, त्यामुळे असं काही करू नका, असं दिशांतने म्हटलं होतं.