Dinesh Karthik: दिनेश कार्तिकची "ही" चूक! अन् लाइव्ह व्हिडिओमध्ये मागावी लागली माफी...
भारतीय क्रिकेट विश्वात दिनेश कार्तिकने आपली अव्वल कामगिरी बजावली आहे. भारतीय क्रिकेट संघासह तो इतर ही टूर्नामेंट खेळून झाला आहे. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघासाठी खेळाताना दिसून येतो. दिनेश कार्तिकने आपल्या निवृत्ती घोषणा केल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे तो चर्चेत ही आला होता. मात्र आता माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने नुकतेच ऑल टाइम इंडिया प्लेइंग इलेव्हनची निवड केली. यामध्ये त्याने इलेव्हनमध्ये रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, हरभजन सिंग या खेळाडूंचा समावेश केला.
मात्र त्याने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला वगळले त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून दिनेश कार्तिकवर टीका करण्यात आली. यादरम्यान धोनीच्या चाहत्यांच्या आणि संपूर्ण क्रिकेट चाहत्यांच्या संतापाला दिनेश कार्तिकला सामोरे जावे लागले. यादरम्यान दिनेश कार्तिकला आपल्या चुकीची कल्पना झाल्या बरोबर त्याने एमएस धोनीचा समावेश न केल्याबद्दल माफी मागण्यासाठी लाइव्ह व्हिडिओ केला आणि त्याने केलेल्या चुकीची माफी मागितली
क्रिकबझदरम्यान माफी मागत असताना दिनेश कार्तिक म्हणाला, भावांनो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली! एपिसोड आल्यानंतर मला माझ्या चुकीची जाणीव झाली. जेव्हा मी ही इलेव्हन निवडली तेव्हा खूप गोष्टी घडत होत्या त्यादरम्यान विकेटकीपर निवडताना एमएस धोनीला इलेव्हनमध्ये समाविष्ट करायला मी विसरलो. राहुल द्रविड इलेव्हनचा भाग होता म्हणून प्रत्येकाला वाटले की मी अर्धावेळ विकेटकीपर ठेवला आहे, पण मी राहुल द्रविड यांचा विकेटकीपर म्हणून विचार केला नाही.
पुढे तो म्हणाला, जर मी पुन्हा 'ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन' निवडली तर मी त्यात नक्कीच बदल करेन. धोनी सर्व फॉरमॅटमध्ये सातव्या क्रमांकावर असेल. धोनी निश्चितच इलेव्हनचा भाग आहे आणि कर्णधारपदही त्याच्याकडेच राहील. त्याचसोबत तो म्हणाला, धोनी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकतो यात शंका नाही. माझ्या मते तो सर्वकाळातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे.