PBKS vs DC
PBKS vs DC

PBKS vs DC : दिल्लीने ११ षटकांत जिंकला सामना;पंजाबचा दारुण पराभव

Published by :
Published on

पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी पंजाबच्या गोलंदाजांना चांगले चोपले. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 9 गड्यांनी पराभव केला.

दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजीपुढे पंजाबच्या संघाची पुरती तारांबळ उडाली. दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी आधी पंजाबच्या फलंदाजांना अडकवले, त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी पंजाबच्या गोलंदाजांना धू धू धुतले. बुधवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 9 गड्यांनी पराभव केला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पंजाबला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी हे आव्हान 58 चेंडू आणि 9 गडी राखून सहज पार केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com