Lsg vs dc | लखनौसमोर 150 धावांचे लक्ष्य
दिल्लीने (Delhi capitals) लखनौ सुपर जायंट्सला (Lucknow super giants) 150 धावांचे लक्ष्य दिले आहे. पृथ्वी शॉ ने सर्वाधिक 61 धावा, ऋषभने नाबाद 39 आणि सर्फराझने 36 नाबाद धावांच्या बळावर दिल्लीने (Delhi capitals) 150 धावा उभारल्या. या धावा आता लखनौ (Lucknow super giants) पुर्ण करते की दिल्ली (Delhi capitals) त्यांना रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow super giants) कॅप्टन के.एल.राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सची (Delhi capitals) टीम प्रथम फलंदाजी करण्यास उतरली होती. डेथ ओव्हर्समध्ये लखनौच्या बॉलर्सनी चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या दोन-तीन षटकात ऋषभ पंत आणि सर्फराझ खान या जोडीला मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. निर्धारीत 20 षटकात दिल्लीच्या (Delhi capitals) तीन बाद 149 धावा झाल्या आहेत. दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ ने सर्वाधिक 61 धावा केल्या. ऋषभने नाबाद 39 आणि सर्फराझने 36 नाबाद धावा केल्या. या धावा आता लखनौ पुर्ण करते की दिल्ली त्यांना रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.