अनावरण करणारी दीपिका पादुकोण जगातील पहिली अभिनेत्री!
कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर त्याला विश्वचषक जिंकता आला आहे. 1978 आणि 1986 नंतर त्याने आता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. तिथे लिओनेल मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाला ३-२ ने आघाडीवर नेले, पण कायलियन एमबाप्पेच्या मनात काही वेगळेच होते. त्याने 117व्या मिनिटाला गोल करून सामना 3-3 असा बरोबरीत आणला. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सामना जिंकला.
अर्जेंटिना-फ्रान्स या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये दीपिकाच्या ड्रेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ड्रेस, त्यावर चॉकलेटी रंगांचं जॅकेट आणि काळ्या रंगाचे बूट असा दीपिकाचा लूक होता.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे चर्चेत आहे.