T20 World Cup: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत दीप दासगुप्तांचं मोठं विधान, म्हणाले; "जर तो १५ चेंडूत..."
Virat Kohli Batting Form : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ग्रुप स्टेजमध्ये विजयी झालेला भारतीय संघ सुपर ८ मधील सामन्यांना सामोर जाण्यासाठी भरपूर सराव करत आहे. भारताचा सुपर ८ चा पहिला सामना अफगानिस्तानविरोधात २० जूनला होणार आहे. भारतासाठी सलामीला खेळणारा फलंदाज विराट कोहलीला अद्यापही धावांचा सूर गवसला नाही. टी-२० वर्ल्डकपमध्ये विराट कोहली धावांसाठी संघर्ष करत आहे. अशातच अफगानिस्तानविरोधात होणाऱ्या सामन्याआधी भारताचे माजी विकेटकीपर फलंदाज दीप दासगुप्ता यांनी विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत काय म्हणाले दीप दासगुप्ता ?
विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत बोलताना दीप दासगुप्ता यांनी स्टार स्पोर्ट्सवर म्हटलं, आम्ही धावांबद्दल बोलत असतो, जे खूप महत्त्वाचे आहे. पण, जेव्हा तुम्ही सलामीला फलंदाजी करता, त्यावेळी या विशेषत: या फॉर्मेटमध्ये इॅम्पॅक्ट खूप महत्त्वाचा आहे. दीपदासगुप्ता पुढे म्हणाले, अशा सामन्यांमध्ये तुम्हाला अशाप्रकारच्या खेळी खेळाव्या लागतील. रोहित शर्माने मागील एक-दीड वर्षापासून खूप जास्त धावा केल्या नाहीत, पण रोहितने संघाला मजबूती देण्याचं काम केलं आहे. १५ चेंडूत २०-२५ धावांची खेळी खराब नाही.
जर त्याने अर्धशतक किंवा शतक ठोकलं, तर ते खूप चांगलं आहे. पण १५ चेंडूत २५ धावा केल्या, तरीही ही कामगिरी चांगली ठरली जाईल. टी-२० फॉर्मेटमध्ये तुम्ही दोन सामन्यांमध्ये धावा केल्या नाहीत, तर तुम्ही खराब खेळाडू होत नाहीत. तुम्ही फॉर्ममधून बाहेर झाले नाहीत. तुम्ही धावांपासून दूर झाले आहेत. हेच विराट कोहलीसोबत घडलं आहे. विराट कोहलीचा इतिहासा पाहता मी त्याच्या फॉर्मबद्दल अजिबात नाराज नाही.