मला अयशस्वी कर्णधार म्हणून...काय म्हणाला विराट कोहली अस?
सध्या बॉर्डर गावस्कर टेस्ट मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा देखील खेळताना दिसत आहे. मालिकेत तो उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. परंतु, त्याआधी तो त्याचा खराब कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत राहिला होता. पण आता नुकताच झालेल्या टी20 आणि वनडेमध्ये त्याचा फॉर्म परतलाय. त्यातच आज आरसीबीची पॉडकास्टमध्ये विराट कोहलीनं अनेक विषयावर भाष्य केलेय. यामध्ये विराट कोहलीने स्वत:च्या कॅप्टनीसवरही वक्तव्य केले आहे.
मी 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेतृत्व केले (फायनलमध्ये पोहोचलो), 2019 विश्वचषक (उपांत्य फेरीत पोहोचलो), मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये नेतृत्व केले (फायनलमध्ये पोहोचलो), आणि 2021 मध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये (नॉकआउटसाठी पात्र ठरू शकलो नाही). तीन (चार) आयसीसी टूर्नामेंटनंतर, मला अयशस्वी कर्णधार म्हणून गणले गेले. असा तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला की, “मी एक खेळाडू म्हणून विश्वचषक जिंकला. मी एक खेळाडू म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मी पाच कसोटी मॅसेज जिंकलेल्या संघाचा भाग आहे. जर तुम्ही त्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे लोक आहेत ज्यांनी कधीही विश्वचषक जिंकला नाही,” असे देखील विराट कोहली यावेळी म्हणाला. सोबतच तो म्हणाला की, अनुष्का शर्माशिवाय धोनीने मला माझ्या कठीण काळात सपोर्ट केला. धोनी माझी मोठी ताकद आहे. धोनीकडून मला खूप मोठा पाठिंबा मिळाला. कुटुंब, लहानपणीचा कोच यांच्याशिवाय फक्त धोनीने कठीण काळात मला मदत केली. खराब फॉर्म असताना धोनीने मानसिक आधार दिला, असे विराट कोहलीने यावेळी सांगितले.