commonwealth games : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात

commonwealth games : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचे २१५ खेळाडू १५ विविध क्रीडा प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा गुरुवारी सायंकाळी अ‍ॅलेक्झँडर स्टेडियम येथे पार पडेल. ब्रिटन गेल्या २० वर्षांत तिसऱ्यांदा या बहुद्देशीय स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धा आयोजनाबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर अखेर बर्मिगहॅमला याचे यजमानपद बहाल करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला (commonwealth games) आजपासून सुरुवात होत आहे. भारताचे २१५ खेळाडू १५ विविध क्रीडा प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा गुरुवारी सायंकाळी अ‍ॅलेक्झँडर स्टेडियम येथे पार पडेल. ब्रिटन गेल्या २० वर्षांत तिसऱ्यांदा या बहुद्देशीय स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धा आयोजनाबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर अखेर बर्मिगहॅमला याचे यजमानपद बहाल करण्यात आले.

भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाचा प्रयत्न या वेळी सर्वोत्तम कामगिरीचा असेल. मागील स्पर्धेत त्यांना एकही पदक जिंकता आले नव्हते. भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल, तर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणाऱ्या महिला संघाचे लक्ष्य अव्वल तीन संघांमध्ये स्थान मिळवण्याचे असेल. बॉिक्सगपटूंनी मागील स्पर्धेत तब्बल नऊ पदकांची नोंद केली होती. कुस्तीमधील १२ खेळाडूंकडून भारताला सर्वाधिक अपेक्षा आहेत. गतविजेता विनेश फोगट आणि बजरंग पुनिया मागील स्पर्धेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील अशी अपेक्षा आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पाच सुवर्णपदकांसह १२ पदकांची कमाई केली होती. मागील स्पर्धेत वेटलिफ्टिंगपटूंनी पाच सुवर्णपदकांसह नऊ पदके मिळवली होती.

२००२ पासून भारतीय संघ या स्पर्धेत अव्वल पाच संघांत असायचा. यासाठी भारताची मदार ही नेमबाजीवर होती. मात्र या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी वगळल्याने वाद निर्माण झाला होता. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या ६६ पदकांपैकी २५ टक्के पदके ही नेमबाजांनी मिळवून दिली होती. यात सात सुवर्णपदकांचाही समावेश आहे. त्यामुळे नेमबाजांच्या अनुपस्थितीत भारतीय पथकाच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा असतील.


commonwealth games : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात
Chess Olympiad Tournament : आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाडला प्रारंभ
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com