Paris Olympic 2024: पहिल्याच दिवशी चीनची 'सुवर्ण' कामगिरी; 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जिंकलं 'गोल्ड' मेडल
Paris Olympic 2024 Day 1 : सीन नदीच्या काठावर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भव्य दिव्य सोहळा पार पडला. ही स्पर्धा मोठ्या धुमधडाक्यात सुरु झाली असतानाच भारताच्या खेळाडूंवर देशातील तमाम नागरिकांचं लक्ष्य लागलं आहे. तत्पुर्वी, ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी आतापर्यंत पाच देशांनी पदकं जिंकण्याची चमकदार कामगिरी केली आहे. चीनने १ सुवर्णपदक, कोरिया प्रजासत्ताक आणि युएसएनं प्रत्येकी १ रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. तर ग्रेट बिटन आणि कझाकिस्ताननेही एक कांस्यपदक जिंकल आहे.
ऑलिम्पिक २०२४ च्या पहिल्याच दिवशी चीनची सुवर्ण कामगिरी
१० मीटर एअर रायफल स्पर्धेत चीनने सुवर्णपदक पटकावलं आहे. चीनने दक्षिण कोरियाचा १६-१२ ने पराभव केला आहे. हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ यांनी सुवर्ण पदकं जिंकली आहेत.भारताचे खेळाडू या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करतील, अशा आशा सर्वांनाचा लागली आहे.
भारताचे खेळाडू सात स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये १८ खेळाडू बॅडमिंटन, नेमबाजी, बॉक्सिंग, रोईंग, हॉकी, टेबल टेनिस आणि टेनिसमध्ये स्पर्धा करणार आहेत. तसच भारतीय पुरुष हॉकी संघही पूल-बी मध्ये न्यूझीलंड विरोधात मोहिमेची सुरुवात करेल.