Cheteshwar Pujara
Cheteshwar PujaraTeam Lokshahi

चेतेश्वर पुजाराने झळकावले इंग्लंडमध्ये द्विशतक

३४ वर्षीय पुजाराने ३३४ चेंडूंत ६०.७७च्या सरासरीने २४ चौकारांसह २०३ धावा केल्या.
Published by :
Saurabh Gondhali
Published on

ससेक्स क्लबकडून ( Sussex ) खेळणाऱ्या पुजाराने (Cheteshwar Pujara) कौंटी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात द्विशतक ( २०१* वि. डर्बीशायर), दुसऱ्या सामन्यात शतक ( १०९ वि. वॉर्करशायर) झळकावल्यानंतर त्याने शनिवारी डरहॅम ( DURHAM  ) विरुद्ध द्विशतकी खेळी केली. ३४ वर्षीय पुजाराने ३३४ चेंडूंत ६०.७७च्या सरासरीने २४ चौकारांसह २०३ धावा केल्या. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर ससेक्सने पहिल्या डावात ५३८ धावांचा डोंगर उभा करून ३१५ धावांची आघाडी घेतली.  

Cheteshwar Pujara
RCB vs MI | मुंबईचा 'सूर्य' तापला; अर्धशतकी खेळी करत बंगळुरु दिले १५२ धावांचे लक्ष्य

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ द्विशतकांचा विक्रम कुमार श्री रणजितसिंहजी यांनी सर्वात आधी नोंदवला. त्यानंतर पुजाराने ही कामगिरी केली. २००८-०९ मध्ये सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने ओदिशाविरुद्ध पहिले द्विशतक झळकावले. त्याने सौराष्ट्र, भारत A, भारत ब्लू आणि भारतीय संघांकडून एकूण १३ द्विशतकं झळकावली आहेत. त्यात आता कौंटी अजिंक्यपद स्पर्धेतील दोन द्विशतकांचा समावेश झाला आहे.      

Cheteshwar Pujara
RCB vs RR : आरसीबी ऑल आऊट; राजस्थानचा 29 धावांनी 'रॉयल' विजय

या द्विशतकासह पुजाराने २८ वर्षांपूर्वी मोहम्मद अझरूद्दीनने नोंदवलेल्या विक्रमाची बरोबरी केली. कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन द्विशतकं झळकावणारा पुजारा हा अझरूद्दीननंतर दुसरा भारतीय ठरला. अझरुद्दीनने डर्बीशायरकडून खेळताना १९९१ मध्ये लिचेस्टरशायरविरुद्ध २१२ व १९९४ मध्ये डरहॅमविरुद्ध २०५ धावा केल्या होत्या. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com