Chess Olympiad Tournament : भारताची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत चमकदार कामगिरी

Chess Olympiad Tournament : भारताची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत चमकदार कामगिरी

भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत (Chess Olympiad Tournament) चमकदार कामगिरी करत रविवारी विजयाची हॅट्ट्रिक साकारली. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाने दिमित्रियस मास्ट्रोवासिलिसचा पराभव केला.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत (Chess Olympiad Tournament) चमकदार कामगिरी करत रविवारी विजयाची हॅट्ट्रिक साकारली. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाने दिमित्रियस मास्ट्रोवासिलिसचा पराभव केला. तसेच युवा अर्जुन इरिगेसीने अथानासिओस मास्ट्रोवासिलिसला ५१ चालींमध्ये नमवले. खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने ग्रीसवर ३-१ अशी मात केली. भारताच्या ‘ब’ संघाने इंडोनेशियाला, तर ‘क’ संघाने ऑस्ट्रियाला नमवले. ‘ब’ संघातील वंतिका अगरवाल आणि सौम्या स्वामीनाथन यांना विजय मिळवण्यात यश आले

भारताच्या ‘ब’ संघाने सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्याला ४-० अशा फरकाने नमवण्याची कामगिरी केली. त्यांनी स्वित्र्झलडचा धुव्वा उडवला. त्यांच्याकडून डी. गुकेश, निहाल सरिन, आर. प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी या युवकांनी आपापले सामने जिंकले. मात्र, सूर्यशेखर गांगुली आणि अभिमन्यू पुराणिक यांना संघर्षांनंतरही बरोबरीवर समाधान मानावे लागले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com