‘माही मार रहा है’.., अर्धशतक पुर्ण करत 132 धावांचे दिले आव्हान
आयपीएल क्रिकेटच्या १५ व्या हंगामाला धमाकेदार सुरूवात झाली आहे. चैन्नईच्या महेंद्र सिंह धोनीने आपल्या आक्रमक अवतारात फलंदाजी करत संघाला 131 धावापर्यंत पोहोचवले आहे. यात महेंद्र सिंह धोनीने आपले अर्धशतक पुर्ण करत नाबाद राहिला तर कर्णधार रविंद्र जडेजा 26 धावा करून बिनबाद राहिला.त्यामुळे आता केकेआर समोर 132 धावांचे आव्हान असणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकला असून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.पहिल्याच ओव्हरमध्ये उमेश यादवने चेन्नईला मोठा झटका दिला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडला भोपळाही फोडू न देता उमेश यादवने त्याला माघारी धाडलं. ऋतुराजला स्लीपमध्ये नितीश राणा करवी झेलबाद केले.डेवॉन कॉनवेला उमेश यादवने तीन धावांवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर KKR च्या शेल्डन जॅक्सनने जबरदस्त स्टम्पिंग केलं. त्याने क्रीझ बाहेर गेलेल्या रॉबिन उथाप्पाला आऊट केलं. उथाप्पा 28 धावांवर आऊट झाला. प्टन रवींद्र जाडेजा आणि रायडूमध्ये धाव घेताना गोंधळ उडाला. रायडू 15 धावांवर रनआऊट झाला. CSK ची स्थिती चार बाद 52 आहे.
एमएस धोनी बनला संकटमोचक
एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नईसाठी संकटमोचक ठरला आहे. संघ अडचणीत असताना धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्याने 38 चेंडूत नाबाद 50 धावा फटकावल्या. यात सात चौकार आणि एक षटकार आहे. उलट कर्णधार रवींद्र जाडेजाच थोडा दबावाखाली वाटला. त्याने 28 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. फक्त एक चौकार त्याने लगावला. कोलकाताने आज टिच्चूक गोलंदाजी केली. CSK ने निर्धारीत 20 षटकात पाच बाद 131 धावा केल्या.