Chamari Athapaththu Record
Chamari AthapaththuGoogle

श्रीलंकेच्या 'या' महिला फंलदाजाने ठोकलं विक्रमी शतक! आशिया चषकात संघाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय

श्रीलंकेच्या या विजयात कर्णधार चमारी अट्टापट्टूचं मोठं योगदान लाभलं. तिनं ६९ चेंडूत ११९ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Srilanka Womens vs Malaysia Womens : महिला आशिया चषक २०२४ चा सातवा सामना आज रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगला. यजमानपद असलेल्या श्रीलंका आणि मेलशिया यांच्यात हा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेच्या टीमनं २० षटकात ४ विकेट्स गमावून १८४ धावा केल्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला मलेशिया संघ अवघ्या ४० धावांवर गारद झाला. त्यामुळे श्रीलंकेनं या सामन्यात १४४ धावांनी मोठा विजय मिळवला. श्रीलंकेच्या या विजयात कर्णधार चमारी अट्टापट्टूचं मोठं योगदान लाभलं. तिनं ६९ चेंडूत ११९ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे.

चमारी अट्टापट्टूने एक शतक ठोकून या विक्रमांना घातली गवसणी

नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. विश्मी गुनारात्ने फक्त एका धावेवर बाद झाली. पण त्यानंतर चमारीने आक्रमक फलंदाजी करून हर्षिता मादवीसोबत ६८ धावा केल्या. हर्षिताने २६, तर अनुष्का संजीवनीनं ३१ धावा केल्या. चमारीनं ११९ धावांची नाबाद खेळी करून मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. महिला आशिया चषकात शतक ठोकणारी चमारी पहिली फलंदाज ठरली आहे.

तसच श्रीलंकेसाठी तिने टी-२० मधील सर्वात मोठी धावसंख्या केली. श्रीलंकेसाठी शशिनी गिम्हानीने सर्वात जास्त ३ विकेट घेतल्या. याशिवाय काव्या कविंदी आणि कविशा दिलहारीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर इनोशी पियदर्शनी आणि सचिनी निसंसलाला प्रत्येकी एका विकेटवर समाधान मानावं लागलं. श्रीलंकाने त्यांच्या ग्रुपमध्ये दुसरा मिळवून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com