Ind Vs Eng : भारताने उभारला धावांचा डोंगर.. इंग्लंडसमोर २२५ धावांचे आव्हान
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२- सामना पार पडत आहे. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र यानंतर भारतीय फलंदाजांनी पहिल्या पाच षटकांत ४४ धावा फटकावत इंग्लंडसमोर २२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये प्रथमच सलामी देत विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. आदिल रशीदने इंग्लंडसाठी पहिले षटक टाकले. या षटकात रशीदने तीनचा धावा दिल्या. पुढच्या षटकात भारताच्या सलामीवीरांनी आर्चरला दोन चौकार खेचले. पाच षटकात या दोघांनी 44 धावा फलकावर लावल्या. तर, पुढच्याच षटकात मार्क वूडला षटकार ठोकत विराटने संघाचे अर्धशतक पूर्ण केले.
यानंतर रोहितने आक्रमक फटकेबाजी करत संघाची धावगती पुढे नेली. आठव्या षटकात सॅम करनला अप्रतिम षटकार ठोकत रोहितने अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 30 चेंडूत रोहितने आपले अर्धशतक साकारले. रोहितने 34 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकार ठोकत 64 धावा केल्या. विराट-रोहितने 94 धावांची सलामी दिली.
त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने रशीदला षटकार ठोकत दहाव्या षटकात भारताचे शतक फलकावर लावले. सूर्यकुमारने मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत इंग्लंडवर आक्रमण केले. इंंग्लंडच्या बाराव्या षटकात या दोघांनी ख्रिस जॉर्डनला चार चौकार खेचले. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या सूर्यकुमारला आदिल रशीदने बाद केले. मोठा फटका खेळलेल्या सूर्यकुमारचा ख्रिस जॉर्डनने सीमारेषेवर सुरेख झेल घेतला. सूर्यकुमारने 17 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा केल्या.