CEAT Cricket Rating Award: शुभमन गिल ठरला सर्वोत्तम क्रिकेटर; सूर्यकुमार यादव, दीप्ती यांचाही सन्मान
मुंबई : भारतातील आघाडीची तयार उत्पादक कंपनी सीएट लिमिटेडने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील, क्रिकेटच्या सर्व प्रकारांतील सर्वात निपुण व सातत्यपूर्ण खेळाडूंच्या यशाचा गौरव करण्यासाठी सीएट क्रिकेट रेटिंग (सीसीआर) अवॉर्ड्सचे आज मुंबईत आयोजन केले होते. सीसीआर हा संपूर्ण क्रिकेट विश्वाला एकत्र जोडणारा आणि सीएट क्रिकेट रेटिंगने जून २०२२ ते मे २०२३ मध्ये दिलेल्या रेटिंगनुसार कामगिरीच्या आधारे, पुरुष व महिला खेळाडूंचा मैदानावर मिळवलेल्या सर्वोत्तम यशासाठी सन्मान करणारा जागतिक प्लॅटफॉर्म आहे.
या क्षेत्रातील प्रवर्तक आणि सर्वसमावेशक रेटिंग म्हणून नावाजल्या जाणाऱ्या सीसीआरने जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवर देखील क्रिकेटमधील यशाचे मूल्यांकन करण्यासाठीचे गोल्ड स्टॅंडर्ड म्हणून स्वतःचे प्रभावी स्थान निर्माण केले आहे.
आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका म्हणाले की, सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड क्रिकेटला पाठिंबा देण्याची २५ वर्षे पूर्ण करत आहे. या निमित्ताने जगभरातील क्रिकेटर्सना आम्ही मनःपूर्वक अभिवादन करतो. त्यांचे असामान्य नैपुण्य व कठोर निष्ठा गौरवास्पद आहे. धैर्याची कसोटी पाहणारे कसोटी सामने, रोमांचक एक दिवसीय सामने आणि टी२० अशा सर्व प्रकारांमध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या सर्व खेळाडूंचा सन्मान आम्ही सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स प्रदान करून करत असतो. क्रिकेट हा खेळ सर्व स्तरांतील, सर्व क्षेत्रांमधील लोकांना एकत्र आणतो आणि आम्हाला आशा आहे की हे पुरस्कार देखील लोकांना एकत्र जोडत राहतील, संपूर्ण जगभरात खेळाला प्रोत्साहन देत राहतील. आगामी विश्व चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा, असे त्यांनी म्हंटले आहे.
दिग्गज भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर म्हणाले, सीएट क्रिकेट रेटिंग हे या महान खेळातील अतुलनीय प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या कार्यात नेतृत्वस्थानी आहेत. यंदाच्या वर्षीचे या पुरस्कारांचे विजेते जागतिक पातळीवरील आदर्श आहेत. आशा आहे की या पुरस्कारांमधून खेळाडूंच्या अनेक पुढील पिढ्यांना उत्तमोत्तम कामगिरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळत राहील.
भारतीय संघातील महिला फलंदाज शेफाली वर्माने सांगितले, सीएटने महिला क्रिकेटला स्वतःची चमक दाखवून देण्यासाठी एक प्रभावी मंच उपलब्ध करवून दिला आहे. आमच्या मेहनतीचे कौतुक एवढ्या मोठ्या पातळीवर केले जात आहे याचा खूप आनंद होतो आहे. माझे असे ठाम मत आहे की, अशा उपक्रमांमुळे जास्तीत जास्त मुलींना या खेळात येण्याची आणि एक व्यक्ती म्हणून स्वतःला अधिकाधिक समर्थ बनवण्याची प्रेरणा लाभेल.
महिला क्रिकेटपटूंनी बजावलेल्या लक्षणीय कामगिरीचा गौरव यावेळी करण्यात आला. 'सीएट विमेन्स इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार दीप्ती शर्मा आणि 'अंडर-१९ विमेन्स वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन' पुरस्कार शेफाली वर्मा यांना देण्यात आला. आपल्या देशात बजावण्यात आलेल्या कामगिरीचा सन्मान करणारा 'सीएट डोमेस्टिक क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार जलज सक्सेनाला देण्यात आला.
सूर्यकुमार यादवला 'सीएट बेस्ट टी२० बॅट्समन' तर भुवनेश्वर कुमारला 'बेस्ट टी२० बॉलर ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात आले. मदन लाल व कर्सन घावरी यांना 'सीसीआर इंटरनॅशनल लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले. क्रिकेट खेळपट्टीवरील दमदार कामगिरीसाठी शुभमन गिलला 'सीएट मेन्स इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना त्याने सांगितले.