Carlos Alcaraz : जोकोविचच्या हातून विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?

Carlos Alcaraz : जोकोविचच्या हातून विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?

अल्कारेझनं अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अल्कारेझनं अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. अल्कारेझनं याआधी वयाच्या 19 व्या वर्षी यूएस ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. कार्लोस अल्कारेझनं पाचव्या सेटमध्ये जोकोविचचा पराभव केला करुन विम्बल्डन विजेतेपद पटकावले आहे.

अल्काराझनं त्याचा पहिला एटीपी सामना रामोस विनोलास विरुद्ध जिंकला होता, तेव्हा अल्कारेझ अवघ्या 16 वर्षांचा होता. स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ हा स्पेनमधील एल पालमार या गावातील रहिवाशी आहे. अल्कारेझनं नोव्हाक जोकोविचला एटीपी गेममध्ये पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यानं माद्रिद ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचचा पराभव केला होता.

अल्कारेझनं टेनिसचे धडे गिरवले. त्यानं अनेक स्पॅनिश आणि युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.अल्कारेझ हा सर्वात कमी वयाच्या पुरुष गटातील उपांत्यपूर्व फेरीचा खेळाडू ठरला. 2022 मध्ये, तो राफेल नदाल आणि जोकोविचला पराभूत करणारा पहिला टीनएजर बनला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com