बिग बी 'अमिताभ बच्चन' यांची भारत विरुद्ध इंग्लडच्या सामन्यापूर्वी ट्विट केलेली कविता चर्चेत
मागील काही दिवसांपासून सगळीकडे आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळतोय. काल उपांत्य फेरीमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंवर मात करून अंतिम फेरीमध्ये स्थान पटकावले. आजच्या भारत विरुद्ध इंग्लड या उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यामध्ये कोण कोणवर मात करणार यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले आहे. क्रिकेट प्रेमीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२००७ च्या ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होण्याची सुवर्णसंधी पुन्हा चालून यावी अशी प्रत्येक क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे, आजच्या भारत विरुद्ध इंग्लड सामन्यात कोण कोणांवर विजय पटकावणार यावरून विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा सामना नक्कीच चुरशीचा होईल.
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन अभिनयासह इतरही छंद जोपासतात, ते क्रिकेटचे ही मोठे चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी बच्चन साहेबांनी भारतीय संघाला प्रेरित करायचा वेगळाच मार्ग अवलंबला, आपल्या सोशल मिडिया वर एक विडीयो वायरल करून संघाला प्रेरित केले, त्यांनी आपल्या कवितेतून आपले क्रिकेट प्रती असलेले प्रेम व्यक्त करत व भारतीय संघांच्या खेळाडूंना प्रेरणा देत असे म्हणाले कि,
“ए निली जर्सी वालो
१३० करोड सपनो के रखवालो,
दिखा के जस्बा लहरा दो तिरंगा..
इस बार फिरसे विश्वकप उठालो ए निली जर्सी वालो…
तुम्हारी बल्लेबाजी के सामने
कौन है जो झुका नही हैI
भेद सके जो गेंदबाजी तुम्हारी
एसा बल्ला बना नही हैI
तुम बस अपनी मेहनत का सिक्का उछालो ए निली जर्सी वालो…
माना के ये इम्तिहान बडा है,
लेकीन तुम्हारे पिछे पुरा हिंदुस्तान खडा हैI
एक बार हमे फिरसे २००७ की खुशी लौटा दो,
ए निली जर्सी वालो, १३० करोड सपनो के रखवालो
इस बार फिरसे विश्वकप उठालो…”
भारतीय संघाचे खेळाडू आज कशी बाजी मारणार, हे पाहायला क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढतेय, कश्याप्रकारे खेळी करून इंग्लंड वर मात करणार याकडे जगभरचे लक्ष लागलेले आहे.