bhuvneshwar kumar
bhuvneshwar kumar

भुवनेश्वर कुमारच्या नावे नकोसा विक्रम;जाडेजाचा रेकॉर्डही मोडला...

Published by :
Saurabh Gondhali
Published on

काल आयपीएलच्या IPL सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SUNRISERS HYDERABAD) विरुद्ध गुजरात टायटन्स (GUJRAT TIATANS असा सामना रंगला होता. या सामन्यांमध्ये हैदराबादच्या संघाने गुजरातचा 8 विकेट्स ने पराभव केला. सलग 3 सामने जिंकणाऱ्या गुजरातचा यावेळी हैदराबादच्या संघाने पराभव केला. यावेळी हैदराबादच्या संघाची सुरुवात फार विशेष झाले नाही. हैदराबादचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या.

नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिली ओवर भुवनेश्वर कुमार यांनी टाकली व त्याला 17 धावा काढल्या. त्याचबरोबर हैदराबादच्या गोलंदाजाने पहिल्या ओवर मध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम भुवनेश्वर च्या नावे नोंदवला गेला आहे. तसेच यंदाच्या आयपीएल सीजन मधील पहिल्याच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देण्यासाठी विक्रम सुद्धा त्याच्या नावे नोंद झाला आहे.भुवनेश्वर कुमारने या षटकात दोन वाईड चेंडू सीमापार गेले. त्यामुळे या दोन्ही चेंडूवर प्रत्येकी 5 अशा 10 धावा नोंदवल्या गेल्या. आयपीएलमध्ये वाईडद्वारे सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हे रेकॉर्ड रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद सिराज (प्रत्येकी 10 धावा) यांच्या नावावर होता. मात्र भुवनेश्वरने पहिल्याच षटकात तीन वाईड चेंडू टाकल्याने या षटकात भुवीला तब्बल 9 चेंडू टाकावे लागले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com