Tokyo Paralympics | टेबल टेनिसपटू भाविना सेमीफायनलमध्ये; भारताला पहिलं पदक निश्चित

Tokyo Paralympics | टेबल टेनिसपटू भाविना सेमीफायनलमध्ये; भारताला पहिलं पदक निश्चित

Published by :
Published on

टोकीओ पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिसपटू भाविना पटेलने सलग तीन सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवल्यामुळे तिने भारतासाठी किमान कांस्य पदक पक्के केले आहे. त्यामुळे भारताचं पॅरालिम्पिकमधील पदकाचं खातं उघडलं गेलं आहे. उपांत्य फेरीत तिची लढत चीनच्या झांग मियाओशी होईल, पण ती अंतिम चारमध्ये पोहोचल्याने तिचे पदक पक्के झाले आहे.

रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती बोरिस्लावा रँकोविक पेरिकला भाविनाने ३-०असे हरवले. भाविना पटेलने गतविजेत्या पेरिकचा अवघ्या १८ मिनिटांत ११-५, ११-६, ११-७असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिस प्रकारात उपांत्य फेरी गाठणारी भाविना पटेल ही पहिली खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरी गाठून भाविनाने कांस्यपदक पक्के केले आहे.याआधी शुक्रवारी भाविनाने ब्राझीलच्या जॉइस डी ऑलिव्हेरावर ३-०असा विजय मिळवला. भाविनाने जॉइसचा १२-१०, १३-११, ११-६ असा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत गेम जिंकला आणि पुढील फेरीत प्रवेश केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com