BCCI ने रद्द केली ‘ही’ सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा
लोकशाही न्यूज नेटवर्क | भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने घेतला आहे. BCCI चे सचिन जय शहा यांनी याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे कळवली आहे.
रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI ने घेतला आहे.सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात.मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर देशातील सहा मुख्य शहरांमध्ये विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेचे वेळापत्रक अंतिम करण्यात येईल.