मोहम्मद शमीवरील टीकांवर बीसीसीआय म्हणाले….

मोहम्मद शमीवरील टीकांवर बीसीसीआय म्हणाले….

Published by :
Published on

टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरूद्ध 10 विकेट्सच्या पराभवानंतर भारतीय संघावर टीका केली जात होती. यात नेटकऱ्यांनी सर्वात जास्त लक्ष मोहम्मद शमीला केले. शमी ट्रोल होताच अनेक आजी माजी क्रिकेटपटू त्याच्या समर्थनार्थ समोर आले. त्यानंतर आता बीसीसीआयने शमीला पाठिंबा दर्शवत एक ट्विट केलं आहे.

पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या विरोधात ट्विटरवर अनेक गोष्टी लिहिल्या जात होत्या. त्यानंतर सर्वात आधी सेहवागने ट्विट करत शमीला पाठिंबा दर्शवला, ज्यानंतर अनेकांनी ट्विट केलं.

या सर्वानंतर बीसीसीआयनेही ट्विट करत शमीला पाठिंबा दर्शवला. 'गर्व (या शब्दासमोर तिरंग्याचा इमोजी लावला आहे), मजबूत, पुढे आणि सर्वोच्च. असे पाच शब्द लिहित आम्हाला शमीवर गर्व असून तो मजबूतीने पुढे जाईल असं बीसीसीआय म्हणून इच्छित असल्याचं अनुमान लावलं जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com