Bajrang Poonia | कुस्तीपटू बजरंग पुनिया जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेबाहेर

Bajrang Poonia | कुस्तीपटू बजरंग पुनिया जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेबाहेर

Published by :
Published on

टोकीओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आगामी कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेबाहेर पडला आहे. पुनियाला लिगामेंट टीअर उपचार करण्यासाठी सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बजरंग यांनी पीटीआयला सांगितले की, "लिगामेंट मध्ये इजा झाली आहे आणि डॉ. दिनशॉ यांनी मला सहा आठवडे प्रकृती पुन्हा नीट होईपर्यंत आराम करण्यास सांगितले आहे. मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.""माझा हंगाम संपला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ही एकमेव मोठी स्पर्धा शिल्लक आहे. मात्र, मी या वर्षी कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही."

वर्ल्ड चॅम्पियनशिप २ ते १० ऑक्टोबर दरम्यान ओस्लो, नॉर्वे येथे आयोजित केली जाईल आणि प्रकृती पुन्हा नीट होईपर्यंत बजरंग प्रशिक्षण सुरू करू शकणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com