Pat Cummins; भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची धाव; ५० हजार डॉलरची केली मदत
देशात कोरोनाची परिस्थती अत्यंत बिकट होत चालली आहे. कुठे ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन्स अशा सर्वच आवश्यक गोष्टींचा तुटवडा भासत असताना आता भारताच्या मदतीला ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज व सध्या कोलकाता नाईट रायडर्समधून खेळणाऱ्या पॅट कमिन्सने धाव घेत, ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. कमिन्सने ट्विट करून हि माहिती दिली. या मदतीनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
कमिन्सने यासंदर्भात एक मोठा मेसेज लिहिला असून त्याने आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचं म्हटलं आहे. तसेच या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचंही कमिन्सनने म्हटलं आहे. इतकच नाही तर कमिन्सने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे.
तसेच लोकांनी आपल्या भावानांना योग्यपद्धतीने वापरु त्याचा कामामध्ये वापर केल्यास बदल नक्की घडले आणि या परिस्थितीवर मात करणं शक्य होईल असंही कमिन्स म्हणाला आहे. मी केलेली मदत फार नाहीय पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अशी मला आशा आहे, असंही कमिन्सने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.