क्रीडा
Asian Games 2023 : सात्विक साईराज अन् चिराग शेट्टी यांनी डमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकत रचला इतिहास
चीनमध्ये सुरु असेलल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी या जोडीने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आहे.
Asian Games 2023 : चीनमध्ये सुरु असेलल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी या जोडीने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आहे. भारतीय जोडीने कोरियाच्या जोडीचा 21 - 18, 21 - 16 असा पराभव केला. विशेष म्हणजे भारताचे एशियन गेम्सचे बॅडमिंटनमधील पहिले सुवर्ण पदक आहे.
चिराग आणि सात्विक यांनी अंतिम सामन्यात कोरियाच्या सोलग्यू छोई आणि वोन्हो किम या जोडीला २१-१८, २१-१६ अशा फरकाने पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. यासह चिराग आणि सात्विक हे आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत.