Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका! ३ रौप्य अन् 2 कांस्यपदक जिंकलं
चीनमध्ये आशियाई स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतानेही या स्पर्धेत भाग घेतला असून स्पर्धा सुरू होताच भारताने पाच पदके जिंकले आहे. भारताने या स्पर्धेत पहिलं मेडल निशानेबाजीत जिंकलं आहे. तर दुसरं मेडल मेंस डबल्स लाइटवेट स्कलमध्ये मिळवलं आहे. ही दोन्ही पदके जिंकून भारताने पदक तालिकेत आपलं नाव समाविष्ट केलं आहे.
भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत
10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य
पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य
पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य
पुरुष कॉक्सड 8 संघ (रोइंग): रौप्य
महिला 10 मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळाले. मेहुली घोष, आशी चौक्सी आणि रमिता यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतासाठी हे पदक जिंकले. त्यानंतर रोइंगमध्येही भारताने रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. भारतीय महिला क्रिकेट संघानेही अंतिम फेरी गाठली. नंतर रमिताने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव करून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारताने 5 पदके जिंकली आहेत.