विराट आणि राहुलच्या जोडीने पाकिस्तानच्या आणले नाकीनऊ; पाकिस्तान पुढे तब्बल 'एवढ्या' धावांचं आव्हान
नवी दिल्ली : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या असलेल्या 2023 आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान-भारतामध्ये महामुकाबला सुरु आहे. भारतीय संघाने प्रथम खेळताना पाकिस्तानला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताच्या केएल राहुल आणि विराट कोहली शतकीय खेळी करत पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले.
रविवारी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी 16.4 षटकांत पहिल्या विकेटसाठी 121 धावा जोडल्या. रोहितने 49 चेंडूत 56 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 4 षटकार आले. तर गिल 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला. त्यानंतर सततच्या पावसामुळे सामना राखीव दिवसात गेला.
यानंतर आज केएल राहुल आणि विराट कोहलीने संयमी सुरुवात केली. सेट झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर जोरदार खेळी केली. दोघांनीही शतके झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. विराट कोहलीने 94 चेंडूत 123 धावांची शानदार शतकी खेळी केली. तर केएल राहुलने 106 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.